भन्नाट!! कसदार ride !!
सायकलिंग सुरु केल्यापासून BRM बद्दल वाचलेले, ऐकलेले होते. Long distance cycling म्हणजे माझ्यासाठी १०० किमी ride होत्या. आत्तापर्यंतची longest ride १२० किमीची ! असे वाटायचे पैसे देऊन ride करण्यापेक्षा आपण आपलेच का करू नये? त्या पैशात मजा करून ride करता येईल. पण म्हणतात ना destiny has its own ways! त्याप्रमाणे BRM चा किडा मनात "जोश "बनून आला, आणि मग planning सुरु झाले. पहिली ride २०० किमी 13.5 hrs ची त्यात elevation हा तर important aspect. त्यामुळे distance साठी long rides ची frequency वाढवायची आणि elevation साठी घाट practice. २०२१ ला elevation वर focus करायचे ठरवले आहे. त्यामुळे BRM साठी पण advantage ठरले असतेच.
जानेवारी १० ला भूलेश्वरची २०० किमी ची BRM होती, त्यात भाग घ्यायचा होता पण घरगुती कारणाने करता नाही आली. पुढची BRM १६ जानेवारीला होती. पुणे - पाचगणी - पुणे. Route वाचून लगेच कात्रज, खंबाटकी आणि पसरणी घाट डोळ्यापुढे आले. लगेच हीच ride करण्याचे fix केले.
पहिलीच BRM असल्याने लगेच तयारी काय करायची याचे गणित सुरु झाले. Head lamp, tail light, reflection
jacket, helmet, bottle holder, electrol powderअशी सगळ्या गोष्टींची जमवाजमव सुरु केली. काही गोष्टी good luck म्हणून हातात आल्या. १५ जाने. ला लवकर झोपण्याचे plan केलेले. ९:३० pm ला आडवा झालो, पण झोपच लागेना. १२:३० च्या पुढे झोप लागली असणार. ३:३० am चा alarm वाजला आणि लगेच आवरायला घेतले. Bag मध्ये सगळे सामान, पाणी आणि गरजेच्या गोष्टी घेऊन तयार झालो. ४:१५ am ला घराबाहेर पडलो. पुणे university gate ला जमायचे होते. तिथे ५ am ला पोचलो तर कुणीच नव्हते. मी जरा जास्तच लवकर पोचलो होतो.😀
५:३०am ला organizers ची car आली आणि मग bike check आणि brevet card मिळाले. At ६ am ride started with full on Josh ! पाषाण रोड ते चांदणी चौक तिकडून बंगलोर हायवे ला लागायचे होते. सकाळच्या गार हवेत मस्त फील होत होते. slow and steady speed ने चांदणी चौक ला पोचलो. सकाळच्या थंड वातावरणात जास्तीतजास्त distance cover करायचे ठरवले होते, त्यामुळे कुठेही न थांबता riding करणार होतो. नऱ्हे gradual climb सुरु झाला. नवीन कात्रज बोगद्यापर्यंत चढाई असणार होती. पुढे २ आणि मागे ४ gear condition वर बोगदा पार केला आणि पुढे शिरवळ पर्यंत उतारच असल्याचा फील होता.
Road condition बरीच चांगली असल्याने ride ला मजा येत होती, पोटात भुकेची जाणीव होती आणि शिरवलपासून climb चा फील येऊ लागला, ऊन पण पडायला लागले होते. खंबाटकीच्या पुढे थोडे खायला थांबलो, घरून पुरणपोळी आणली होती, ती खाल्ली आणि खंबाटकीच्या वाटेल लागलो. खंबाटकी climb करायची पहिली वेळ होती. Bike वर केला होता पण cycling पहिल्यांदाच. खंबाटकी चढताना हळूहळू ऊन पण लागायला लागले होते. Climbing practice च्या वेळेस १-४/ २-४ चा gear ratio use करायचो. तोच pattern वापरून, slowly खंबाटकी पार केला. नंतरचा descend was relief एका हॉटेल ला थांबून चहा आणि पुरणपोळी खाल्ली आणि वाईच्या road ला लागलो आणि तो पहा काय सुंदर रस्ता आहे. दोन्ही बाजूला सुंदर झाडी, उन्हाचा कमी त्रास आणि almost वाई पर्यंत उतारच !!
वाई गावात पोचल्यावर घाटाच्या रस्त्याला लागलो. हा पण घाट सायकलिंग करत पहिल्यांदाच चढणार होतो. ११ किमी घाट म्हणजे challenging असणार हे नक्की. ऊन आता भरात आले होते. Climb gradual होता. पण distance जास्त असल्याने १:४ च्या gear ration ने slow climb ला सुरुवात केली. आपल्याला घाटाचा रस्ता पूर्ण दिसत असतो, दूरवर पसरलेला. मान खाली घालून pedaling करत राहायची. ६ किमी नंतर ब्रेक घ्यावा लागला. पाणी पिऊन तहान भागत नव्हती. Electrol संपलेले. मग पुन्हा घाट सुरु केला. कंटाळवाणा घाट म्हणता येईल. संपता संपत नाही. Control point पाचगणी गावात होता. त्यामुळे तिथपर्यंत चढाईच होती. Cars ने पण गर्दी केली होती. Control point आता येईल, तेंव्हा येईल अशा आशेने pedaling सुरु होती. Finally पुरोहित hotel चा board दिसला आणि हुश्श झाले.
पोहोचल्यावर पहिले brevet card stamp केले. आणि डोसा ऑर्डर केला. म्हंटले इकडे वेळ कमी घालवू. पाण्याच्या बाटल्या fill केल्या. आणि मग पुण्याकडे कूच केली. आता १२ किमी चा उतार होता. खूप मोठा relief 😃. घाटातून पांडवगड काssssय सुंदर आणि भक्कम दिसत होता. ब्रेकवर हात ठेवत safely घाट खाली उतरलो. आता खरी मजा होती. वाई पासून gradual climb सुरु झाला. उन्हाचा त्रास आता जाणवू लागला होता. Mapro garden ला थांबून पाणी प्यायले आणि highway ची वाट बघत pedaling करू लागलो. नशीब रस्ता चांगला होता. highway ला लागलो आणि पुन्हा चढाईच होती.
खंबाटकीचा उतार खुणावत होता. अजून एक relief. एवढा घाट चढून आल्यावर हा उताराचा रस्ता म्हणजे सुटकेचा निश्वास. आपल्या कष्टाचे फळ . घाट उतरून पुन्हा चढ उताराचा खेळ सुरु झाला. Highway ला लहान लहान चढ आहेत त्यामुळे दमायला झाले. वेग मंदावला होता. उन्हामुळे drain व्हायला सुरुवात झाली. बहुतेक मी नीट जेवायला हवे होते. Breaks ची संख्या वाढली. लिंबू पाणी, stretching साठी लहान लहान ब्रेक घेत होतो. उन्हामुळे असह्य झाले होते. एका ठिकाणी थांबून बॅग मधली पुरणपोळी खाल्ली, थोडावेळ stretch केला. अचानक वातावरण बदलले देवाचीच कृपा आणि ढगाळ वातावरण झाले. उन्हाचा दाह एकदम गेलाच. पुन्हा slowly cycling सुरु केली. कापूरहोळ चा फाटा आला आणि पुन्हा जीवात जीव आला. पुणे जवळ आल्याचा feel आला. तरी पण चढाचा sequence कायम होता.
खेड शिवापूर toll ला चहा parle G खाऊन energy घेतली. ४ pm वाजलेले. आता कात्रजच्या उताराची वाट बघत pedaling सुरु होते. वातावरण बदलल्याने आता मजा येत होती. बराच वेळ बाकी असल्याने आता निवांत झालो होतो. कात्रजच्या बोगद्यामध्ये रास्ता अजिबात smooth नव्हता. खडखडीत असल्याने vibrations जाणवत होती. त्या उतारावर जागोजागी पांढरे पट्टे मारलेले आहेत. त्यामुळे सायकल चा एक अन एक पार्ट vibrate होत होता. नऱ्हे पर्यंत उताराने साथ दिली. मग पून्हा नऱ्हे , वडगाव, वारजे आणि final चांदणी चौक एवढे चढ बाकी होते. वारजेच्या अलीकडच्या bridge वर एका cyclist चे टायर puncture झाले. तिकडे थांबून त्याला support केला. Puncture काढण्यापेक्षा tube change करणे easy म्हणून लवकर निभावले. त्याच्या pump मधून हवा भरली जाईना . त्याने कमी हवेवर पोचण्याचे ठरवले. मी पुढे निघालो. वारजे आणि चांदणी चौकाचा climb सावकाश cross करत finally CCD ला पोचलो. तिथे "जोश" द्विगुणित झाला. Reporting केले आणि successfully २०० किमी ची BRM पूर्ण केली. ६:१० pm ला पोचलो होतो. म्हणजे साधारण १२ तास १० मिनिट्स मध्ये २०० किमी पूर्ण केले होते.
Achievement ची नशा काही वेगळीच असते. एक wish पूर्ण केल्याचे समाधान होते.🌺
जबरदस्त!!!! काय लिहिलं आहेस. एकदम मी च अनुभवत आहेस असं वाटलं. हेच कौशल्य आहे लिहिणाऱ्या चे. Exxxxcellllent achievement 👏👏 Conggggratilations...
ReplyDeleteThank you Jyoti😇. Josh kayam hai🤩
DeleteSo very well written. Excellent journey and blog.
ReplyDeleteYash - Na tu zameen ke liye hai na aasmaan ke liye.. tera wajood jo hai wo hai aisi daastaan ke liye..
ReplyDeleteTu tapasya karta hai .. uska fal hai ye sab.. way to go.
Proud to learn so much from u n dream to join a brm with u.
Thanks bhai😇
DeleteEk number bhava..
ReplyDeleteThe way you wrote it make reader feel that he is actually taking this ride while reading
Thank re Kedar😇
Deleteयशा, अचाट अशी कामगिरी अगदी सहजासहजी पार पाडलीस. तुझ्या ह्या नशेला सलाम. अशीच उत्तुंग शिखरे गाठत रहा, कुठेतरी आमच्या सारखे मावळे सुद्धा तयार होतील म्हणजे तुझ्या ह्या जिद्दीला पाहून.
ReplyDeleteBhava nakkich karshil tu💪
DeleteEk number bhava.. Mastch
ReplyDeleteThanks Tatya😇
DeleteWell executed, Nicely written,
ReplyDeletefantastic journey.congratulations
Thank you!!😇
Deletewell planning and execution :)
ReplyDeletekhup chan lihile aahes bhava
inspired from you :)
congratulation & god bless you:)
Thanks Ganesh😇
Delete