Wednesday 14 December 2022

SRT( Sinhgad-Rajgad-Torna) Ultra marathon 2022

 २०२२ हे वर्ष अल्ट्रा मॅरेथॉन साठी द्यायचे हे ध्येय ठरवले होते. वर्षाच्या सुरुवातीपासून धावण्याचा सराव नियमितपणे सुरु केला. मध्ये मध्ये इंज्युरीमुळे काही दिवस गॅप होत होता पण जास्त दिवस गाडी रुळावरून खाली घसरू दिली नाही. मनात 50kms मध्ये सहभागी व्हावे असा प्लॅन होता त्याप्रमाणे स्पर्धा शोधू लागलो. SRT (सिंहगड-राजगड-तोरणा) अल्ट्रा मॅरेथॉन बद्दल खूप ऐकलं होते. 2300mts चा elevation gain  हे एक जबरी challenge होते. त्यामुळे ही स्पर्धा करायची असे ठरवून नाव नोंदवले.

१० डिसेंबर २०२२ ला सकाळी ६ वाजता 50kms चा फ्लॅग ऑफ होता. मी चिंचवड वरून सिंहगड पायथ्या ला येणार असल्याने पहाटे ३ ला गजर लावून ३.४० ला घराबाहेर पडलो. पहाटे ५.१० ला स्पर्धेच्या स्टार्ट पॉईंट ला पोचलो. रुनींग चे कपडे अंगावर चढवले आणि ड्रॉप बॉग जमा केली. ती बॅग मी 25kms च्या aid स्टेशन ला घेणार होतो. जेणेकरून मला हॅट आणि ड्राय फ्रुटस तिकडून घेता येईल. स्टार्टींग पॉईंट ला ब्रेकफास्ट ची सोय केली होती तिकडे चहा घेतला. रेस स्टार्ट व्हायला २० mins बाकी असतांना वॉर्म उप सुरु केला. मला IT band आणि ankle चा issue असल्याने त्याच्या स्पेसिफिक ड्रिल्स केल्या.



६ वाजता छत्रपती शिवरायांच्या जयघोषात रेस ची सुरुवात झाली. सकाळच्या थंड वेळेत शक्य तेवढे अंतर कापावे असे मनात ठरवून त्या पेस ने रन ला सुरुवात केली. पहिले २ kms डांबरी रोड च होता. आतकरवाडी पासून एलेवेशन सुरु झाले. बऱ्याच वेळेस सिंहगड वारी झाली असल्याने तो रस्ता आणि पायवाट बऱ्यापैकी परिचयाची होती. कुठेही न थांबता सिंहगडाचा चढ सुरु केला. धावण्याचा जागा चालण्याने घेतली. पुणे दरवाजापाशी पोचलो तेव्हा watch madhe ६.४७ झाले होते. सिंहगड च्या strava सेगमेंट "Sinhgad Half Vertical KM " मध्ये ३३.१५ mins चा वेळ दिसला. व्यवस्थित वेळेत पोचलो होतो. 

Aid station १ कडे निघालो. तिकडे electrolyte ड्रिंक एका बाटली मध्ये भरले आणि सोबत २ केळी घेतल्या आणि जास्त वेळ न दवडता झुंजार बुरुजाकडे कडे वाट धरली. जागोजागी volunteers होते आणि runners ला guide करत होते. "जय शिवराय" ची घोषणा प्रत्येक volunteer कडून  येत होती आणि आमच्यासारख्या शिवप्रेमी runners कडून त्याच घोषणेने त्यांना प्रतिसाद मिळत होता. या वर्षी पासून कल्याण दरवाजाची वाट स्पर्धेसाठी बंद करण्यात आली होती त्यामुळे झुंजार बुरुजाच्या वाटेने राजगडाकडे निघायचे होते. सुरुवातीलाच एक्सपोज्ड patch होता. तिकडे ropes लावून सेफ्टी precaution घेण्यात आली. सावधपणे तो patch उतरलो आणि पायवाटेला लागलो. अत्यंत निसर्गरम्य असा हा patch . सूर्योदय तर लाजवाब दिसत होता त्या वाटेने. सूर्याची सोनेरी किरणे तिथल्या पिवळ्या झालेल्या गवतावर पडून सोनेरी मुल्याम्याची झालर च त्या पूर्ण पायवाटेवर दिसत होती. आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत पुढे वाटचाल सुरु केली. जिकडे फ्लॅट रस्ता होता तिकडे धावत अंतर कापत होतो. चढाई च्या ठिकाणी चालत energy conserve करत होतो. dehydration चा त्रास होऊ नये म्हणून मध्ये मध्ये electrolyte आणि पाणी घेत होतो. एका ठिकाणी लुज दगडावरून पाय घसरून डाव्या पायाचा ऐकले मुरगळला. जोरात कळ गेली. त्यामुळे तिकडे जरा थांबून ankle च्या आजूबाजूला मसाज केला आणि चालायला लागलो. मनात देवाच्या धावा केल्या कि असल्या कारणामुळे race मध्ये अडथळा नको येऊ देऊ. नशिबाने पुढे जास्त त्रास झाला नाही.  या वाटेत नागफणी traverse ला रोपे बांधला होता कारण तिकडे पण एक्सपोज्ड patch होता. Scree मुळे तो patch जरा सावकाशपने पार केला. त्यानंतर उतरण सुरु झाली. सुरुवातीचा भाग खूप steep descend असल्याने तिकडे रोप बांधला होता. पुन्हा ankle sprain नको म्हणून मी निवांतपणे पूर्ण उतरण उतरलो. तसे ही descend हा माझा weak पॉईंट आहे.कोणताही किल्ला किव्वा हिल चढण्यापेक्षा मला उतरायला च जास्त वेळ लागतो.  शेवटी विंझर गावचा डांबरी रस्ता लागला. तिकडून मग पुन्हा धावायला सुरुवात केली. थोड्या अंतरावर Aid स्टेशन २ होते. तिकडे electrolyte आणि पाणी रिफील केले. थोडे खजूर आणि बिस्कीट खाऊन पुढे धावायला सुरुवात केली. विंझर ते गुंजवणे(राजगड पायथा) हे अंतर डांबरी रोड वरून पळायचे होते. बऱ्याच वेळ trail वर पळून आता डांबरी रोड वर आल्याने पाय बोलयला लागेल. रन-walk सुरु झाले. चढ येईल तेव्हा चालायचे आणि फ्लॅट रोड वर पळायचे. उन्हाचा परिणाम आता जाणवायला लागला.३-४ kms झाल्यावर calf मध्ये cramp आला. थोड्या थोड्या वेळाने पाणी आणि electrolyte घेऊन सुद्धा cramp आल्याने जरा surprise झालो. पण थांबून फायदा नव्हता त्यामुळे चालायला लागलो. चालतांना त्रास होत नसल्याने अंतर कापले जात होते. शेवटी ३ तास ३६ mins मध्ये गुंजवणे गावात पोचलो.तिकडे Aid स्टेशन ३ होते. स्पर्धेचा अर्धा टप्पा इथे संपला.25kms झाले. ड्रॉप बॅग मधून हॅट, खडीसाखर, मीठ आणि ड्राय फ्रुटस सोबत घेतले. ड्रॉप बॅग तिथेच रिटर्न केली जेणेकरून ती बॅग मला फिनिश line ला मिळेल. तिकडे खायला होते पण खाऊन किल्ला चढणे फार अवघड जाते त्यामुळे खाण्याचे टाळले. फक्त electrolyte , केळी आणि खजूर खाल्ले. तिकडे physiotherapist massage आणि stretching करून देत होते. तेव्हा वाटले कि cramp साठी massage करून घ्यावा. पण तिकडे जरा queue होती त्यामुळे ते न करता मी राजगडाच्या वाटेला निघालो . ही एक चूक झाली ते मला लवकरच समजले. थोडे अंतर चढल्यानंतर पहिले उजव्या calf मध्ये भयंकर cramp आला. खाली बसून त्याला massage करण्याशिवाय पर्याय नव्हता.तिकडे १० mins बसलो. electrolyte आणि सॉल्ट चे intake वाढवले. पण cramp आल्यावर त्याला रिलॅक्स केल्याशिवाय पुढे जाणे अशक्य होते. रेस्ट घेतल्याने cramp release झाला आणि मी पुन्हा चढाई सुरु केली. राजगड चा रॉक patch च्या आधी डाव्या पायात cramp आला . सेम इंटेन्सिटी . मग पुन्हा बसून massage करत त्याला release करण्याचे प्रयत्न करत होतो. यावरून मला कळून चुकले कि Aid स्टेशन ला physio कडून massage केला असता तर ही परिस्थिती आली नसती. हार्ड lessons learned ! 

Finally चोर दरवाजाने पद्मावती माचीवर पोचलो. बरीच गर्दी होती राजगडावर.  तिकडून सुवेळा माचीकडे मोर्चा वळवला. पळण्याचा प्रयत्न सोडून दिला कारण cramp चा फील येत होता. त्यामुळे चालताच सुवेळा माची गाठली. तिथून संजीवनी माची कडे निघालो. उन्हाचा चटका आता चांगलाच जाणवायला लागला. जिकडे छान झाडी होती तिकडे हळूहळू पळत होतो. अळू दरवाजाने तोरण्याच्या वाटेला लागायचे होते. संजीवनी माची ला पूर्ण वळसा घातल्यावर घसारा होता. तिकडे पुन्हा rope बांधले होते. सावकाशपणे तो भाग उतरलो. आणि मग कारवी चे जंगल सुरु झाले. अत्यंत आल्हाददायक patch . राजगड ते तोरणा मध्ये ७०% पायवाट ही कारवीच्या झाडीमधून जाते . उन्हामध्ये हा भाग खूप दिलासा देऊन गेला. 4th Aid स्टेशन la 2pm चा intermediate कट ऑफ होता. त्यामुळे तो लवकर गाठायचा प्रयत्न करत होतो.कारवी च्या झाडीमुळे तरतरी आली. cramp पुन्हा येऊ नये म्हणून काळजीपूर्वक रन-walk करत होतो. १२.३६ pm ला Aid स्टेशन ला पोचलो. म्हणजे गुंजवणे गाव ते 4th Aid स्टेशन पोचायला ३ तास लागले. तरी sufficient वेळ होता. आता या Aid स्टेशन ला दोन्ही calf ची massage करून घेतली. electrolyte आणि केळी खाल्ली. massage केल्याने खूप रिलॅक्स वाटले आणि पुढचे पूर्ण अंतर मला calf cramp चा त्रास नाही झाला. व्हेरी much थँक्स to the physiotherapist टीम !!! 

तोरणा कडे चालायला निघालो. सावलीमधून चालतांना effort कमी लागत होते. शक्य तिथे पळून अंतर कापत होतो. या संपूर्ण SRT route वर जागोजागी volunteers सपोर्ट आणि encouragement ला होते. वेग कमी झाला होता कारण जिकडे झाडी नव्हती तिकडे उन्हाचा त्रास व्हायला सुरुवात झाली. पाणी आणि electrolyte वेळेवर घेत असतांना पण dehydration सारखे symptoms जाणवत होते. तोरण्याचा शेवटच्या climb ला एकदम drain झाल्यासारखे वाटले. Ladder चढून तोरण्यावर आलो आणि तिकडे १० mins रेस्ट घेतली. रेस्ट घेतल्यामुळे पुन्हा फ्रेश वाटू लागले. शक्य तेवढ्या पेस ने कोकण दरवाजा कडे पोचलो. आता तोरण्याचा मोठा descend होता. बराच patch सावली मध्ये असल्याने उतरतांना थकवा जाणवत नव्हता. फक्त पायाचे सगळे muscles ओरडायला लागले होते. तोरणा पार्किंग च्या 5th आणि लास्ट Aid स्टेशन ला पोचलो. तिकडे पाणी रिफील करून Velha गावाकडे उतरायला सुरुवात केली. इथे pan बऱ्याच ठिकाणी घसारा होता त्यामुळे निवांत बसून ते patch उतरलो.

Velha गावात आल्यावर शेवटचे 7kms गुंजवणे धरणाच्या आजूबाजूने पळायचे होते. मानसिकदृष्ट्या आपण रेस संपली अश्या अवस्थेत असतांना हे 7kms जरा हेवी वाटले. आपण खात्रीने रेस पूर्ण करणार हा एक आनंद पण असतो त्या उत्साहात हे अंतर शक्य तेवढे पळून काढायचा प्रयत्न केला. फक्त चढावर चालत जाण्याचे कायम ठेवले. शेवटचा किलोमीटर बाकी असतांना मात्र energy संपली होती त्यामुळे चालत चालत फिनिश line कडे निघालो. ती समोर दिसल्यावर मात्र उरलेले 100mts अंतर पळत फिनिश line क्रॉस केली!!! 

Hurrreeey !! याचसाठी केला होता अट्टहास!! . अत्यंत समाधानी होतो रेस पूर्ण केल्यावर. १० तास ३६ मिनिटे आणि १६ सेकंड्स मध्ये 53kms चा टप्पा पूर्ण केला होता.  



तिकडे stretching करून जेवण केले आणि ड्रॉप बॅग collect केली. पुन्हा सिंहगड कडे जाण्यासाठी गाड्या तयार होत्या. मनात खूप आनंद असला कि तो व्यक्त कसा करावा हे कळत नाही तसं काहीसे माझे झालेले. रेस पूर्ण केल्याच्या विचारताच गाडीत बसून सिंहगड पायथ्या ला आणि तिकडून स्वतःच्या bike ने घरी पोचलो. अश्यारीतीने या वर्षीचे ध्येय पण पूर्ण झाले.


रेस organizers बद्दल नक्कीच लिहिले पाहिजे. मला वाटते कि SRT series ची स्ट्रेंग्थ ही त्यांचे volunteers आहेत. त्यांच्यामुळे ही रेस सुखकर झाली. superb planning अँड सपोर्ट!!  प्रत्येक रनर ने या स्पर्धेचा अनुभव एकदा तरी घेतला पाहिजे हे नक्की. Endurance आणि मेंटल स्ट्रेंग्थ ची कसोटी बघणारी ही स्पर्धा. स्पर्धा म्हणजे काय हो ; दुसऱ्या तिसऱ्या कुणासोबत नसून स्वतःशीच स्पर्धा आहे ही.